#माजी ग्रा.पं.सदस्य महांतेश पाटील यांचा पुढाकार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील बरगांव ग्राम पंचायत हद्दीतील गटारी तसेच सरकारी प्राथमिक मराठी शाळेसमोरील कचरा व गटारी ग्राम पंचायतीने त्वरित स्वच्छ करावे.अशा मागणीचे निवेदन माजी ग्राम पंचायत सदस्य महांतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बरगांव ग्राम पंचायतीच्या पी डी ओ ना देण्यात आले होते.
याची दखल घेऊन नुकताच ग्राम पंचायतीच्या स्वच्छता कामगारानी बरगाव ग्राम पंचायत हद्दीतील गटारी स्वच्छता केली. कचरा काढुन टाकला.
दि. १५ आँगष्ट स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे. तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गावात शाळेच्या आवारात स्वच्छता पाहिजे.यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी गाावतील गटारी, तसेच सरकारी प्राथमिक मराठी शाळे समोरील कचरा व गटारी स्वच्छ झाल्या पाहिजेत.याची खबरदारी घेऊन ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य ,भाजप नेते महांतेश महादेव पाटील ,मंगेश पाटील, किरण पाटील,
तानाजी पाटील,रतुल धामणेकर,बी जी पाटील,रामू वागळेकर, सिध्दू दळवी,लक्ष्मण पाटील,विरूपाक्ष पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.