#तर वडील शेखर शेट्टी यांचा ८६ वा वाढदिवस साजरा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर, प्रतिनिधी
खानापूरचे सुप्रसिद्ध दंतवैद्य डॉ. सुनील शेट्टी यांचा ५० वा वाढदिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला. यावेळी खानापूर डॉक्टर असोसिएशन तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) खानापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. डी. नाडगौडा यांच्या हस्ते डॉ. शेट्टी यांचा शाल, मैसुरी हार परिधान करून तसेच केक कापून वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
याच प्रसंगी डॉ. सुनील शेट्टी यांचे वडील शेखर शेट्टी यांचा ८६ वा वाढदिवसही कुटुंबीय व मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदोत्सवात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास आयुष अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राम पाटील, आनंद सडेकर तसेच इतर अनेक डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी डॉ. सुनील शेट्टी यांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश, कीर्ती आणि समाजसेवेची अधिकाधिक संधी लाभो, तसेच शेखर शेट्टी यांना निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी घरगुती पध्दतीने वाढदिवस आनंदाने साजरा करण्यात आला .
