#सुकामेवा,कडधान्ये,मसाले पदार्थही मिळणार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील वर्दे पेट्रोल पंप जवळील वर्दे काॅप्लेक्स येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या अन्नपूर्णा ड्राय फुड तसेच सुकामेवा,कडधान्य व मसाले पदार्थ योग्य दरात मिळावे.यासाठी अन्नपूर्णा ड्राय फूड दुकानाचा उदघाटन समारंभ नुकताच पार पडला.
यावेळी मालक विवेकानंद हणमंत गुरव यानी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.तर खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार हणमंत गुरव यानी ड्राय फूड शाॅप बद्दल माहिती दिली.
यावेळी अन्नपूर्णा ड्राय फूड दुकानाच्या उदघाटन प्रसंगी खाानपूर तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग मेलगे श्रीफळ वाढविले.तर भाजप राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी, कैप्टन पांडुरंग मेलगे, धनश्री सरदेसाई, एम डी श्री पाटील, भाजपचे नेते लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरे,सदानंद होसुरकर, पांडुरंग पाटील, डाॅ.डी. ई.नाडगौडा,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार हणमंत गुरव म्हणाले की, शरीर तंदुरस्त राहण्यासाठी ड्राय फुडचा आहार सर्वात चांगला असतो.याजबरोबर खेळांडू, जीम्स स्पर्धक, कुस्तीपटु, धावपटू आदीना याची नितांत गरज असते.या साठी अन्नपूर्णा ड्रायफुड शाँप सवलतीच्या दरात खेळांडुना उत्तम दर्जाचा आहार देण्यास सदैव तयार राहिल असे मत व्यक्त केले.
यावेळी विवेकानंद गुरव यानी आभार मानले.
