संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील तहशीलदार कार्यालयात शिवशरण हडपद अप्पण्णा यांची जयंती बुधवारी दि. २९ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाची सुरूवात श्री स्वामी अडवी सिध्देश्वर यांच्या सान्निध्यात आमदार विठ्ठलराव हलगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवशरण हडपद अप्पण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, ‘हडपद अप्पण्णा हे १२ व्या शतकातील महान शिवशरण होते. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांनी आपल्या वचनांतून सामाजिक समता, बंधुता आणि श्रमाचे महत्त्व पटवून दिले,’ असे विचार व्यक्त केेले.
याप्रसंगी श्री. स्वामी अडवी सिद्धेश्वर , तहसीलदार, दुडप्पा कोमार यांनीही आपले विचार व्यक्त केले. हडपद समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील कर्मचारी, विविध पक्षाचे नेते तसेच हडपद समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोंढा ग्रा.पं.मध्ये जयंती साजरी.
लोंढा ( ता.खानापूर ) येथील ग्राम पंचायतीसमाजातील शिवशरण हडपद अप्पण्णा यांची जयंती बुधवारी दि. २९ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भाजप नेते अशोक नेसरीकर यांच्याहस्ते फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना अशोक नेसकीकर यानी आपल्या भाषणात हडपद अप्पण्णा यांच्या शिकवणुकीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला लोंढा ग्राम पंचायत अधिकारी, कर्मचारी वर्ग व गावातील नागरीक उपस्थित होते.
