#गर्लगुंजी माजी ग्रा.पं.सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्याहस्ते जर्सीचे आनावर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील माऊली स्पोर्ट्स क्लब यांच्या २०२६-२७वर्षाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जर्सीचे अनावरण मारुती मंदिर समुदाय भवनात पार पडले. माऊली स्पोर्ट्स क्लब गर्लगुंजी या संघाची विजयी घोडदौड सातत्याने चालू आहे.
या माऊली स्पोर्टस् क्लब संघाने मागील. वर्षामध्ये
माचीगड पहिला,माळ अंकले पहिला, नंदगड पहिला,जांबोटी पहिला,हलसाल पहिला ,कापोली पहिला, हलशी पहिला,माडीगुंजी दुसरा त्याचबरोबर जिल्ह्या बाहेर ही भरपूर विजय मिळविले आहेत हाफ पीच, फूल पीच या दोन्ही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा मध्ये त्यांची विजयी घोड दौड कायम राहिली आहे.त्याचबरोबर हा संघ गावात विविध कब्बडी,क्रिकेट, हॉलीबॉल सारखे सामने भरवतो आणि यशस्वीपणे पार पाडतो.या संघासाठी जर्सीचे प्रायोजक गर्लगुंजी ग्राम पंचायत माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील त्यांच्या उपस्थितीत जर्सी चे अनावरण करण्यात आले.पी.के.पी.एस सोसायटीचे उपाध्यक्ष विनोद कुंभार,अष्टपैलू खेळाडू प्रताप पाटील,परशराम आस्टेकर,कर्णधार सागर कोलेकर,पांडुरंग भातकांडे यांचे मार्गदर्शन ह्या संघाला आहे.यावेळी
यश चौगुले,हरीश चौगुले ,योगेश पाटील,मल्लप्पा पाटील,निलेश निट्टुरकर ,श्रेयश,निट्टुरकर,
मंथन पाटील,प्रणय यलारीचे
संदेश कोलेकर,गणेश पाखरे ,भुजंग मेलगे,गंधर्व बिर्जे
दत्ता पाटील ,दत्ता देसाई, एकलव्य चे प्रशिक्षक प्रशांत पाखरे, कल्लाप्पा लोहार
अनंत पाटील,
हे खेळाडू उपस्थित होते.यंदाच्या सर्व स्पर्धांसाठी संघाला शुभेछा देण्यात आल्या.या पूर्वी गावातील एकलव्य संघाकडून गावातील सर्व प्राथमिक माध्यमिक शालेय मुलासाठी जर्सी, बॅग, बॉटल वितरण करण्यात आले होते त्याचे ही मुख्य प्रायोजक प्रसाद पाटील ह्यांनीच होते.व्यसनापासून दूर राहून गाव व्यसन मुक्त व्हावे,,चांगल्या सवयी लावून घेणे.स्पर्धा मध्ये गाव तालुक्याचे नाव उज्वल करणे आणि मुलानी क्रीडा क्षेत्रात करिअर करने हाच उद्देश असल्याचे प्रसाद पाटील यांनी सांगितले..