संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवार दि. १३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता शिवस्मारक येथे महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे.
याबैठकीत नुकत्याच पार पडलेल्या उच्चअधिकारी समितीच्या बैठकीचा सविस्तर वृतांत घेण्यात येणार असुन तसेच सीमा प्रश्न संदर्भात राबविण्यात आलेल्या एक लाख सह्यांच्या मोहिमेतील सह्यांच्या पुस्तिका जमा करणे आदी विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.तरी समितीच्या पदाधिकार्यानी तसेच कार्यकर्त्यानी,सर्व मराठी भाषाप्रेमीनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री मुरलीधर पाटील व श्री निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री आबासाहेब दळवी यांनी केले आहे.