#पुलाच पाहणी पी डब्ल्यूडी अभियंते श्री गस्ती यानी केले. ग्रा पं, माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर,बाळू नाईक,राजू सावंत, महादेव कवळेकर, सातेरी परशेकर,शंकर शास्त्री आदी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील निलावडे आंबोळी रस्त्यावरील मलप्रभा नदीवरील पुलाची पाहणी शुक्र वा री दि, १० रोजी खानापूर तालुका आमदारांच्या आदेशानुसार तसेच निलावडा पंचायत हद्दीतील नागरिकांच्या विनंतीनुसार खानापूर पीडब्ल्यूडी असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर श्री गस्ती व त्यांचे सहकारी यांनी मलप्रभा नदीवरील पुलावर जाऊन पाहणी केली.
यावेळी निलावडे ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, आंबोळी येथील पीके पीएस सदस्य ओमनी नाईक व आंबोळीतील प्रतिष्ठित युवा कार्यकर्ते व माजी एसडीएमसी अध्यक्ष बाळू आप्पे नाईक आदीनी उपस्थित होते.
या मलप्रभा नदीवरील पुलावर दर वर्षी पावसामध्ये एक ते दोन फूट पाणी येत आहे आणि पुलाच्या साईडच्या कठड्या तुटल्यामुळे नागरिकांना पुलावरून येण्या जाण्यासाठी धोका निर्माण झाला आहे तेव्हा पुलावरील साचलेले पाणी काढण्याची व साईडचे कठडे बांधून त्याला पाईप घालून संरक्षण निर्माण करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पीडब्ल्यूडी असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर श्री गस्ती यांनी पुलावरील पाणी काढण्यासाठी आपल्या सहकार्याना सूचना दिल्या.व थोडा पाऊस कमी झाल्यानंतर साईडचे कटडे बांधून संरक्षण देण्यात येईल असे सांगीतले.
तसेच कान्सुली क्रॉस ते आंबोळी पुल या तीन किलोमीटर रस्त्यासाठी निधी मंजूर असून कामाचे टेंडर प्रक्रिया पार पडल्यानंतर कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन खानापूर तालुक्याच्या आम दा रानी दिले.