#वनखात्याच्या अधिकार्याकडुन निंगाणी यांचे स्वागत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्याचे वनाधिकारी ( भरारी पथक )म्हणून एस एस निंगाणी यांची वर्मा लागली असुन नुकताच त्यानी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली असुन वनखात्याच्या अधिकार्याकडुन एस एस निंगाणी यांचे स्वागत करण्यात आले.
एस एस निंगाणी हे मुळचे बेळगावचे असुन त्यानी यापूर्वी खानापूर बेळगाव,
दांडेली,आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.
या पूर्वी त्यानी शिर्शी येथे एसीएफ म्हणून कार्यरत होते.त्यांची नुकतीच बेळगाव जिल्ह्याचे डीसीएफ ( भरारी पथक) म्हणून बढती वर बदली झाली आहे, त्याच्या अखत्यारित कारवार,धारवाड,गुलबर्गा व बोळगावचा समावेश आहे.
यापूर्वीच त्यांची बेळगावला बदली झाली होती.पण यल्लापूर व बनवासी या दोन्ही जंगलाच्या मधोमध असलेल्या हजारो कोटीचे अतिक्रमण त्यांच्या पुढाकाराने दूर करण्यात आले.यामुळे त्यांची थांबली होती.पण आता याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी बदली स्विकारली, त्याच्या प्रयत्नामुळेच शेकडो एकर जमीन वनखात्याला परत मिळाली आहे.