संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शिक्षकीसेवेत राहुन ३२ वर्षाच्या काळात अनेक शाळातील सहवास तेथील आठवणी,सुखदु: खाचे अनुभव,तसेच विद्यार्थ्याच्या सान्निध्यात राहुन रममान झालो.व मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालो.असे मनोगत गणेबैल ( ता. खानापूर) उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक एस एल भक्तुरी यानी सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोपिनकट्टी ग्राप पंचायतीचे माजी उपाध्यक्ष एम के गुरव होते.
यावेळी बोलताना एस एल भक्तुरी म्हणाले की माझ्या शिक्षकी सेवेची सुरूवात १९९४ साली वरकड पाटे या पूर्व प्राथमिक मराठी शाळेतुन झाली.याशाळेत १२ वर्षो सेवा बजावली.त्यानंतर तालुक्यातील जटगे , हारूरी,या शाळेत सेवा बजावली,याकाळात शाळेला आदर्श शाळा पुरस्काराचा मान मिळाला.
तेथून इदलहोंड सी आर पी म्हणून मी रूजू झालो.याकाळात विविध शाळाचा अनुभव घेतला.त्यानंतर सिंगीनकोप मराठी शाळेत सेवा बजावली,याचवेळी पर्यावरण पक्षी मित्र पुरस्कार मिळाला.
तेथून मी मुख्याध्यापक म्हणून काटगाळी शाळेत बढती मिळाली.तेथून बरगाव शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली तेथून मुख्याध्यापक म्हणून गणेबैल उच्च प्राथमिक मराठी शाळेत सेवा करून निवृत्त झालो.असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपिठावर प्रभारी बीईओ मंजुनाथ हत्ती, बीआरसी संतोष नाईक, मुख्याध्यापक एस एन कम्मार,शिक्षक संघटना उपाध्यक्ष के एच कौंदल, कार्यदर्शी बी बी चापागांवकर, बीजेपी नेते सदानंद हो सुर कर, तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे परशराम खांबले, शिक्षक सुरेश भातकांडे,मल्लापा वार्णोळकर,निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड, म ए समितीचे नेते मर्याप्पा पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व सत्कार मुर्तीचा परीचय एल व्ही गुरव यानी केले.
तर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरानी सत्कार मुर्ती एस एल भक्तरी यांच्या कार्याबदल गौरव उदगार काढले.
यावेळी सत्कारमुर्ती एस एल भक्तुरी यांचा कुटूंबाच्यावतीने तसेच बीईओ कार्यालयाच्यावतीने तसेच वर्ग मित्र परिवार, विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, तसेच एस डी एम सी कमिटी,तोपिनकट्टी ग्रामस्थांच्यावतीने शाल,पुष्पहार व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार केला.
कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षक,शिक्षणप्रेमी नागरीक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आभार हणमंत करंबळकर यानी मानले.
