#मंगळवार पासुन प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराचे ग्रामदैवत श्री मर्याम्मा देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदाही उद्या मंगळवारी दि.९ व बुधवारी दि.१० असे दोन दिवस चालणार आहे.
यात्रेची तयारी झाली असुन मंदिराच्या आवारात रंगरंगोटी, विधुत रोषणाई करण्यात आली आहे. विविध दुकानानी मंदिराचा आवार गजबजलेला आहे.
उद्या मंगळवारी सकाळी ७ वाजता श्री मर्याम्मा देवीला अभिषेक व गार्हाणे घालुन यात्रेची सुरूवात होणार आहे.त्यानंतर दिवसभर देवीला ओट्या ,नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी १०.३० वाजता गार्हाणे घालुन धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहे. रात्री १० वाजता मर्याम्मा देवीच्या यात्रेची सांता होणार आहे.
या मर्याम्मा देवीच्या यात्रेला खानापूर शहरासह बेळगाव जिल्ह्यतुन तसेच महाराष्ट्र ,गोवा राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
भाविकासाठी विविध साहित्याची दुकाने तसेच लहान मुलासाठी खेळण्याची दुकाने, पाळणे आ दी ची सोय करण्यात आली आहे.
