इयत्ता ६ वी पर्यतच्यावर्गाला एकच कन्नड शिक्षक,विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान!
मराठी अतिथी शिक्षकावर चालते शाळा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम जंगलभातील मुघवडे ( ता. खानापूर) येथील सरकारी मराठी शाळेत इयत्ता ६ वी पर्यतचे वर्ग आहेत. विद्यार्थ्याची ३५ पट संख्या आहे.मात्र या शाळेत कायम स्वरूपी एकच शिक्षक तो ही कन्नड शिक्षक गेल्या कित्येक वर्षापासुन आहे.मात्र मराठी माध्यमच्या शाळेत एक ही कायम स्वरूपी शिक्षक नाही.
त्यामुळे मुघवडे (ता.खानापूर) सरकारी मराठी शाळेच्या विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तेव्हा मुघवडे शाळेला कायमस्वरूपी मराठी शिक्षक देण्याची मागणी निलावडे ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या नेतृत्वा खाली शाळा सुधारणा कमिटीच्यावतीने सोमवारी दि.८ रोजी बीईओ पी रामाप्पा याना देण्यात आले.
निवेदणात म्हटले आहे.की गेल्या अनेक वर्षापासुन मुघवडे शाळेत कायमस्वरूपी एकच कन्नड शिक्षक आहे.मात्र मराठी शिक्षक नाही.अतिथि शिक्षक देऊन दिवस काढत आहेत.
तेव्हा कायमस्वरूपी मराठी शिक्षक द्यावा.अशी मागणी केली.
यावेळी बीईओ पी रामाप्पा यानी सध्या कायमस्वरूपी मराठी शिक्षक नाही.अति थी शिक्षकाची सोय करू.असे आश्वासन दिले.
निलावडे ग्राम पंचायत अध्यक्ष विनायक मुतगेकर, कांग्रेस नेते प्रकाश मादार, एस डी एम सी अध्यक्ष राहुल राणे,सदस्य रामा बेटगीकर,अमोल बरगावकर,मोहन गवाळकर, सहदेव म्हाजीक,मष्णू ओशिलकर,कृष्णा हुळणकर,मारुति बेटगिकर,उपाध्यायक्षा विद्या बेटगीकर,सदस्या पूनम बेटगीकर,वैष्णवी चिखलकर,नेहा भट्ट,पूनम चिखलकर,विणा चव्हाण,प्रियंका ओशिलकर,भागीरथी मादार आदी उपस्थित होते.
