#भंडरगाळी मराठी शाळेचे कन्नड शिक्षक विठ्ठल चलवादी यांचा सेवानिवृत्त निमित्त रविवारी सत्कार सोहळा संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या ३१ वर्षाच्या कालावधीत माझ्या हातुन अनेक विद्यार्थी शिकुन गेले आहेत.काही विद्यार्थी शिकुन उच्च शिक्षित झाले.,उच्चपदावर कार्यरत आहेत.याचा मला अभिमान असुन हीच माझी गुरू दक्षिणा आहे.
असे विचार भंडरगाळी( ता.खानापूर ) येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे कन्नड़ शिक्षक विठ्ठल कल्लापा चलवादी यानी आपल्या सेवानिवृत्त निमित्त सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे जेष्ठ नागरीक भाऊराव पाटील होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की ३६ वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतुन ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झालो.माझा जन्म पारिश्वाड (ता.खानापूर) येथे झाला.
नोकरीची सुरूवात सन १९९० मध्ये गदग जिल्ह्यातील माड्डवी गावात झाली.
तेथून १९९५ साली भंडरगाळी (ता.खानापूर) येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेत कन्नड शिक्षक म्हणून बदली झाली.
याशाळेत गेली ३१ वर्षे कन्नड शिक्षक म्हणून सेवा बजावली. माझ्या हातुन अनेक विद्यार्थी घडले. गावाने मला भरभरून प्रेम दिले.हेच माझे सौभाग्य आहे.असे उदगार काढले.
प्रारंभी सत्कारमुर्तीची सपत्नीक गावातुन मिरवणुकीने स्वागत केले.
त्यानंतर कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने व फोटो पुजनाने झाली.
यावेळी प्रास्ताविक माझी मुख्याध्यापक एस डी पाटील यानी केेले.तर उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक एन एस पाटील यानी केले.
व्यासपिठावर एस डी एम सी अध्यक्ष कमलाकर पाटील,सदस्य दीपक पाटील,कल्लापा पाटील,लक्ष्मण पाटील,रमेश पाटील, शंकर पाटील,गावचे नागरीक हणमंत पाटील, प्रकाश पाटील, निळकंठ पाटील,निवृत्ती पाटील ,विलास पाटील,माजी शिक्षक संघटना अध्यक्ष वाय.एम पाटील, मुख्याध्यापक एस एन कम्मार, बी बी चापगावकर, माजी सीआरपी गोविंद पाटील, माजी शिक्षण संयोजक एस व्ही चोपडे,माजी मुख्याध्यापिका सौ.वंदना पाटील,श्री वराळे,
व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त सत्कार मुर्ती विठ्ठल चलवादी ढांचा सपत्नीक एस डी एम सी व शाळेच्यावतीने तसेच गावच्यावतीने, विविध मुख्याध्यापक व शिक्षक आजी माजी विद्यार्थी आदीच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार,भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन माजी मुख्याध्यापक एस डी पाटील यांची तोपिनकट्टी येथे मुख्याध्यापकपदी बढती निमित्त बदली झाल्याने त्याचा ही शाळेच्यावतीने व एसडीएमसी च्यावतीने तसेच विविध मान्यवरांच्याहस्ते शाल,श्रीफळ,भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आजी माजी विद्यार्थ्यानी ,सत्कार मुर्तीच्या कार्याबद्दल गौरव उदगार काढले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात बोलताना अध्यक्ष भाऊराव पाटील म्हणाले की, या शाळेचे कन्नड शिक्षक चलवादी यानी आपल्या ३१ वर्षाच्या कालावदीत गावच्या विद्यार्थ्याना उत्तम शिक्षण दिले.तेच विद्यार्थी आज उच्चपदावर कार्यरत आहेत.
तेव्हा मराठी शाळेतुन शिक्षण घेतलेले विद्यार्थी सुध्दा उच्चपदावर आहेत. तेव्हा इंग्लिश मिडीयम शिक्षणाचे भूत पालकानी काढुन टाकावे.व आपल्या मातृभाषेतुन मुलाना शिक्षण द्यावे.असे आवाहन केेले.
कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिराजी पाखरे,व एल व्ही गुरव यानी केले.
आभार मुख्याध्यापक एन एस पाटील यानी मानले.

