#दि संत गोरा समाज विकास मंडळाच्या बैठकीत निर्णय!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तालुक्यात कुंभार बांधवाना शासनाच्या योजनेची माहिती मिळत नाही. त्यासाठी गावपातळीवर बैठका घेवून शासनाच्या योजनेची माहिती देण्याबरोबर त्याचा लाभ कसा घ्यावा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याची माहिती दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार यांनी दिली.
ते रविवार (दि.७) रोजी मंडळाच्या मासीक बैठकीत अध्यक्ष या नात्याने बोलत होते. प्रारंभी सचिव परशराम पालकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ठ केला. गेल्या महिन्यात झालेल्या वयोवृध्द नागरिकांचा सत्कार कार्यक्रमाचा जमा खर्चाचा आढावा घेतला. बैठकीत मंडळाचे ऑडिट करणे, प्रत्येक आठवड्यात गावपातळीवर बैठका घेणे, राजा श्री दक्ष फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यासमवेत चर्चा करुन समाजकार्याची दिशा ठरवणे. या विषयावर चर्चा झाली. या बैठकीचे औचित्य साधून समाजातील निवृत्त शिक्षक पुंडलिक कुंभार, प्रताप मुरगोड, रघुनाथ उत्तुरकर यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. बैठकीला उपाध्यक्ष सोमनाथ कुंभार, खजिनदार नागाप्पा उत्तुरकर, सदस्य मोहन कुंभार, दुल्हाजी कुंभार, यशवंत पालकर, सातेरी कुंभार, अमर कुंभार उपस्थित होते.
