#विद्यार्थी,पालक शिक्षक व एस डी एम सी
कमिटीचा उत्सहात सहभाग!

संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप ( ता. खानापूर ) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत १ जुन शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी शाळेच्या प्रवेशव्दारात विद्यार्थ्याचे शिक्षक,एस डी एम सीच्यावतीने पुष्प देऊन व चाॅकलेट देऊन स्वागत करण्यात आले.
पालक, शिक्षक महासभेचे आयोजन!
सिंगीनकोप मराठी शाळेत प्रारंभोत्सव झाल्यानंतर पालक,शिक्षक महासभेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष विश्वनाथ पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, माजी तालुका पंचायत सदस्या सौ.कविता कुंभार, एस डी एम सी उपाध्याक्षा सौ.चित्रा कुंभार,सदस्य नागेश कुंभार,सोमनाथ मादार,परशराम पाटील, विनायक कुंभार,राजाराम पाटील, मोहन कुंभार, सदस्या सौ मोहिनी कुंभार,सौ.शालन पाटील,सौ.स्वाती कुंभार,सौ.माधुरी कुंभार,सौ.लक्ष्मी कोलकार,सौ ललीता पाटील, सौ.राजश्री पाटील, सौ.वैशाली पाटील आदी उपस्थतीत होते.
प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक पी.एम कुंभार यानी केले.तर स्वागत कन्नड शिक्षिका सौ.एल.डी. नलवडी यानी केले.
यावेळी पाहुण्याच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी शिक्षकानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले .तर पालकाना सुचना केल्या,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी एम कुंभार यानी केले.आभार कन्नड शि क्षिका सौ एल डी नलवडी यानी मानले.