#माजी विद्यार्थीच्या सहकार्यातुन, लक्ष्मी यात्रेचेऔचित्य साधुन सोहळ्याचेआयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील हलशी येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमीच्या सहकार्यातुन उभारण्यात आलेल्या “अमृत महोत्सवी प्रवेशव्दाराचे लोकार्पण सोहळा आज शुक्रवारी दि.१० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी अध्यक्ष विशाल गुरव असुन उदघाटक निवृत्त मुख्याध्यापक एन एल पाटील यांच्याहस्ते होणार असुन दीप प्रज्वलन आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार दिगंबर पाटील,अरविंद पाटील,डाॅ.अंजली निंबाळकर,बीईओ पी.रामाप्पा ,व इतर मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
या वेळी विविध फोटोचे पुजन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
तर प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन एस डी एम सी कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
