#पत्रकार परिषेदत कृष्णा गुरव यानी दिली माहिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
डोंगरगाव ( ता. खानापूर ) येथे मंगळवारी दि.३१ मार्च रोजी रवळनाथ देवा च्या वार्षिक उत्सवानिमित रात्री ११ वाजता नाटप्रयोगानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाटकाच्या व्यासपिठावर आमदार विठ्ठल हलगेकर यानी आपल्या भाषणात आरेरावीची भाषा वापरत, अन्य ठिकाणी तुझे मुंडके उडविले असते. असे वक्तव्य केले.असा आरोप शिरोली पीकेपीएस सोयटीचे चेअरमन व माजी ग्राम पंचायत अध्यक्ष कृष्णा गुरव यानी गुरूवारी दि.२ एप्रिल रोजी खानापूर येथील सरकारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधात बोलविलेल्या पत्रकार परिषेद केला.
यावेळी ते म्हणाले या संदर्भात मी वकीलाशी संपर्क साधुन त्याच्याशी चर्चा करून आमदारांच्या विरोध्दात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगीतले.
यावेळी ते म्हणाले आमदारानी मागील एका प्रकरणाचा राग ठेवून त्यानी मला अन्य ठिकाणी तुझे मुंडके उडविले असते.असे वक्तव्य केले आहे.यावेळी व्यासपिठावर आमदार विठ्ठल हलगेकर,भाजप नेते किशोर हेब्बाळकर, भरमाणी पाटील ,माजी तालुका पंचायत अशोक देसाई तसेच अप्पू गावकर व मी कृष्णा गुरव हजर होतो.
या वेळी व्यासपिठावर नेत्यांची भाषणे झाली.माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई भीमगड अभयारण्यातील गावांच्या स्थलांतराबद्दल तसेच नागरी कां च्या समस्याबाबत आपले विचार मांडले.इतर मान्यवरानी ही स्थानिक समस्या मांडल्या.
तर कृष्णा गुरव यानी आपल्या भाषणात गावाच्या स्थलांतराचा विषय मांडत, कुटूंबाला १५ लाख रूपये देऊन अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यापेक्षा एकाच ठिकाणी सर्वाचे पुनर्वसन केले तर गाव एकत्रीत राहिल.एवढेच नव्हेतर नागरीकांच्या जमिनीची कवडी मोलान विक्री करण्यापेक्षा सरकारकडुन त्याच्या समस्या सोडवा.स्थलांतरचा प्रश्नच उदभवत नाही.असे सांगताच आमदारानी कृष्णा गुरव याचे एकू नका.,अन्यथा याभागाचा विकास होणार नाही.असे म्हटल्याचा आरोप केला.
यावेळी कृष्णा गुरव म्हणाले की, याभागातील शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे हाॅस्टेल ही बंद झाले.असे सांगुन आमदारांच्या गुंडूगिरीचा मी निषेध करते असे सागीतले.
या वेळी पत्रकार परिषदेला शिरोली पीकेपीएस सोसायटीचे चेअरमन कृष्णा गुरव, शिरोली गावचे सीताराम सुतार,बाळाराम नांद्रनकर आदी उपस्थित होते.