#माजी चेअरमन सौ.धनश्री सरदेसाई यानी पत्रकार परिषेदत दिली माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी (ता.खानापूर ) येथील पी के पी एस सोसायटीची पंच वार्षिक निवडणुक रविवारी दि.२२ मार्च रोजी पार पडली.या निवडणुकीत बीन कर्जदार गटातुन एका मयत सभासदाचे मतदान झाले आहे.
त्यामुळे मी ज्या बीन कर्जदार गटातुन. निवडणुक लढविली.त्या गटात ५९ , ५९ मतदान झाले.व समान मतदान झाल्याने चिट्ट्या काढून निकाल लावण्यात आला.त्यात माझ्या विरोध्दातील गटातील उमेदवाराला विजय मिळाला.मात्र यात मयत सदस्यांचे नावे मतदान केल्याचे विरोधकाच्या गटातील मतदाराने स्पष्ट केले असुन वकीला मार्फत कोर्टात केस दाखल केली असुन चौकशी सुरूआहे.अशा प्रकारे मयताच्या नावे मतदान होण्याचा प्रकार खानापूर तालुक्यातील पी के पी एस सोसायटीच्या निवडणुकीत होत असल्याचे उघड झाले.तेव्हा भविष्यात खानापूर तालुक्याच्या ५८ पी के पी एस सोसायटीच्या निवडणुकीत असा प्रकार होऊन नये. यासाठी तालुक्यातील शेतकर्यानी सावधगीरी बाळगावी. असे आवाहन जांबोटी पी के पी एस सोसायटीच्या माजी चेअरमन सौ.धनश्री सरदेसाई यानी सोमवार दि.३० मार्च रोजी खानापूरात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत केले.
१५ वर्षे जांबोटी पीकेपीएस सोसायटीत कार्यरत साडे सात वर्षे चेअरमन!
जांबोटी पीकेपीएस सोसायटीत गेली १५ वर्षे कार्यरत असुन साडे सात वर्षे स्वत: चेअरमन पदाची धुरा सांभाळली असुन
गेल्या पाच वर्षात ६ कोटी १४ लाख रूपये कर्ज पत पुरवठा करून ६५० शेअर्सवरून १४०० शेअर्सचा आकडा गाठला आहे.तसेच शेतकर्याना पाच वर्षात पाच टॅक्टरचे वितरण केले आहे.तसेच पावटेलर, शिक्षणासाठी विद्यार्थ्याना कर्ज देणे अशी कामे केली आहेत.
विरोध्दी गटाने निवडणुक जिंकण्यासाठी मतदारांची संख्या वाढविली!
मी गेली पाच वर्षे चेअरमन असताना मला अंधारात ठेवून विरोधकानी कर्जदार गटात ६० मतदारांची संख्या वाढविली तर बीन कर्जदार गटात ५४ मतदातरांची संख्या वाढविली.यात सोसायटीचा स्टाॅफ सहभागी होता.कारण मी चेअरमन असताना
घाणेरडे राजकरण करत माझ्या विरोध्दात पॅऩल उभारून सत्ता मिळविण्यासाठी ६०कर्जदार शअर्स केवळ चेअरमनची सही नसताना,ठराव पास नसताना, केवळ चुकीच्या पध्दतीने १००० रूपयाचे कर्ज वाटप, करून मतदारांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. तर बिन कर्जदार गटात ५४ शेअर्स दारा ना ५० रूपये कर्ज दाखवुन मतदाराची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला.हा प्रकार मी थांबविला.तेव्हा तालुक्यात ५८ पीकेपीएस सोसायटीमधुन भविष्यात असा प्रकार घडु नये .व शेतकर्याचे भविष्य धोक्यात घालु नये.यासाठी माझा हा प्रयत्न आहे.
मतदाराना देवा च्या शपथी,नारळ दाखवणे!
जांबोटी पीकेपीएस सोसायटीच्या काळात याभागातील मतदाराना निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी अनेक देवाच्या शपथी घेणे.नारळ दाखवुन भिती दाखविणे.मतदाराना रातरात घरातुन पळवुन नेणे, असले घाणेरडे राजकरण जांबोटी पी के पी एस सोसायटीच्या निवडणुकीत घडल्याची माहिती जांबोटी पीकेपी एस सोसायटी च्या माजी चेअरमन सौ.धनश्री सरदेसाई यानी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी पत्रकार परिषदेला चंद्रकांत देसाई,पावणापा देसाई,सुधाकर गावडे, भाऊ कर्लेकर, सौ.भाग्यश्री पाटील,लक्ष्मण हंगीरगेकर,प्रमोद देसाई,शशिकांत पाटील, मारूती देसाई,राम देसाई,गणपती पाटील,अशोक इंगळे, महेश देसाई,बाळकृष्ण देसाई,विनोद देसाई आदी जांबोटी ग्रामस्थ उपस्थित होते.
