संदेश क्रांति न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील अस्तोली गावचे नव्याने बाधण्यांत आलेले ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दि.३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
यावेळी सकाळी ११ वाजता हंडी भडंगनाथ मठाचे मठाधीश पीरयोगी मोहननाथजी महाराज यांच्या हस्ते कळसारोहण सोहळा होणार आहे.
यावेळी गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री रमेश तवडकर व खानापूर तालुक्याचे आजी माजी आमदार यांच्याहस्ते मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विनोद मिराशी व रेमाणा मिराशी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी,व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अस्तोली गावच्या पंचकमिटी,ग्रामस्थ व श्री जय हनुमान युवक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
