#प्रवाशातुन कमालीची नाराजी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी ते सन्नहोसुर रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून ये जा करणार्या तोपिनकट्टी, सनहोसुर, निडगल, बिदरभावी,गावच्या प्रवाशाना , नागरीकाना
शाळा , काॅलेजच्या विद्यार्थ्याना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन संबधित खात्याच्या अधिकार्यानी, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष केल्याने ही रस्त्याची अवस्था झाली आहे. आज यारस्त्यावरून येताना सर्वजन शासनाच्या नावाने लाखोली वाहताना दिसतात.
येत्या पावसाळ्यापर्यत संबधीत यारस्त्याकडे दुर्लक्ष केले तर पावसाळ्यात या रस्त्यावरून ये जा करणे कठीण होणार आहे.
तेव्हा संबधित खात्याच्या अधिकारी वर्गाने तोपिनकट्टी ते सन्नहोसुर रस्त्याची दुरावस्था पाहुन लवकरच रस्त्याचे काम हाती घ्यावे.अशी मागणी याभागातील नागरीकांतुन होत आहे.
