#भाजप राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरीनी केली अधिकार्याना सुचना!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गस्टोळी दड्डी गावातील काही घराना वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने रात्रीच्या वेळी नागरीकाना व विद्यार्थ्याना आंधारात राहावे लागत आहे.त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या परीक्षा सुरू आहेत. अशा काळात वीज पुरवठा बंद होऊन विद्यार्थ्याना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यावर कायम स्वरूपी तोडगा काढुन वीज पुरवठा सुरळीत करावा.अशी सुचना भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी यानी खानापूर हेस्काॅम कार्यालयाचे कार्यकारी अभियंते प्रविण बळगार याना केली.
या वेळी लागलीच कार्यकारी अभियंते प्रवीण बळगार यानी बिडी सेक्शन आँफिसरला समस्या सांगुन वीज पुरवठा सुरळीत करण्यास सांगीतले.
या वेळी गस्टोळी दड्डी भागातील शेतकरी व नागरीकानी समाधान व्यक्त केले .
