#बुधवारी व गुरूवारी दोनदिवस सोहळा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथील अमरदिप युवक मंडळाच्यावतीने श्रीगणेशमुर्ती प्राणप्रतिष्ठापणेचा २४वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी दि.२५ व गुरूवारी दि.२६ रोजी असे दोन दिवस चालणार आहे.
बुधवारी दि.२५ रोजी पं.पू.संत रामदास महाराज यांच्या सान्निध्यात सकाळी ७ ते ८ यावेळेत श्रीमंगलमुर्तीला अभिषेक आमदार
विठ्ठल हलगेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव गुरव निवृत्त मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत. यावेळी दीप प्रज्वलन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते होणार आहे.
तर विविध देव देवताच्या प्रतिमेचे पुजन एम डी सदानंद पाटील,मारूती गुरव , सौ अनिता मुरगोड,चन्नापा गुरव,अशोक गुणापाचे,नागेंद्र गुंजीकर, मनोहर गुरव,
भरमाणी पाटील,बालकृष्ण पाटील ,पीडीओ राजाराम हलगेकर,हुवाप्पा गुरव आदीच्याहस्ते होणार आहे.
यावेऴी विविध मान्यवरांचा सत्कार ही होणार आहे.
गुरूवारी दि.२६ रोजी सायंकाळी सत्यनारायण महापुजा व महाआरती,त्यानंतर संगीतभजनी कार्यक्रम तर रात्री ८. ३० वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी भक्तानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन अमरदिप युवक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
