संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लोकोळी ( ता. खानापूर ) ये थे सा ला बाद प्रमाणे यं दा ही लोकोळी जैनकोप श्रीज्ञानेश्वर पारायण सोहळ्याला गुरू वा री दि ५ मार्च रोजी प्रारंभ झाला.
ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरूवाक सकाळी पोथी स्थापना व फोटो पुजनाने झाली.
या वेळी आमदार विठ्ठल हलगेकर, राज्य कार्यकारणी सदस्य व बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,व उपस्थित मान्यवराच्याहस्ते दीपप्रज्वलन व विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
या वेळी बोलताना बेळगाव जिल्हा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की लोकोळी गावात संत परंपरा गेल्या कित्येक वर्षा पासुन जपली आहे.घरोघरी वारकरी मोठ्या संख्येने आहेत.त्यामुळे प्रत्येकांच्या घरी संताच्या भक्तीचा मार्ग असल्याने मुलाच्यावर चांगले संस्कार घडतात.घरात आनंदाचे वातावरण राहते.युवा पिढी व्यसनापासुन लांब राहते.घरी , मंदिरात भजनाचा ,टाळ मृदंगाचा आवाज कानावर पडतो.त्यामुळे जीवन सुखी राहते.व व्यसनापासुन चार हात दुर राहाता येते.
तेव्हा युवापिढीनी भक्तीच्या मार्गाने वाटचाल केल्यास गावात सुख समाधान नांदते. व ज्ञानेश्वरी पारायण सारखा सन प्रत्येक वर्षी साजरा होतो.असे विचार व्यक्त केले.
या वेळी आम दार विठ्ठल हलगेकर यानी लोकोळी गावची पारायण सोहळ्याची प्रथा वर्षानु वर्षे अशीच उत्साहाने राहु दे .अशी सदिच्छा व्यक्त केली.
य़ावेळी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित मान्य वरांचा सत्कार केला.