#खानापूर मराठी भाषिकांतुन मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा मराठी भाषिक तालुका म्हणून ओळखला जातो. खानापूर तालुक्यात ८० टक्के जनता मराठी भाषिक असुन केवळ २० टक्के जनता कन्नड भाषिक असुन जास्तीत जास्त जनता मराठी भाषिक आहे.जसी खानापूर तालुक्याची परिस्थिती आहे. तशीच परिस्थिति खानापूर शहरात आहे.
असे असताना खानापूर शहरात केवळ सरकारी कन्नड माध्यमचे हायस्कूल कित्येक वर्षापासुन सुरू आहे.,मात्र खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम हायस्कूलची सुरूवात करण्यास इतकी वर्षे ओलाडुन गेली.याकडे कुणीच लक्ष वेधले नाही.एकीकडे ८० टक्के मराठी जनतेच्या मतावर मराठी भाषिकच आमदार होतो.भविष्यात ही मराठी भाषिकच आमदार होणार यात तिळ मात्र शंका नाही.
परंतु मराठी भाषिक आमदाराना खानापूर शहरातील सरकारी कन्नड माध्यमच्या इमारतीत एक सरकारी मराठी माध्यमचे हायस्कूल सुरू करण्यास आमदाराना काय वावडे आहे.अशी शंका खानापूर शहरातील मराठी जनतेतुन व्यक्त होत आहे.
# सरकारी मराठी हायस्कूल नसल्याने खासगी संस्थेच्या हायस्कूलमध्ये भरमसाठ पैशांचा चुराडा, गरीब कुटूंबाच्या समस्या!
खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यमिक हायस्कूल नसल्याने खानापूर शहरासह शहरालगतच्या अनेक खेड्यातील विद्यार्थी खासगी शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये भरमसाठ फी,व इतर भरमसाठ खर्च करून शिक्षण घेतात.तेच सरकारी मराठी माध्यम हायस्कूल असते तर मागासवर्गीय जातीच्या
विद्यार्थ्याना मोफत शिक्षण मिळाले असते.सरकार ते या विविध योजनाचा लाभ मिळाला असता.विद्यार्थ्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत झाली असती.याकडे एक पदवीधर व निवृत्त मुख्याध्यापक म्हणून झालेल्या आम दारा ना कधी समजणार तालुक्याचा विकास कसा साधणार ?
तेव्हा यंंदाच्या शैक्षणीक वर्षात तरी खानापूर शहरातील सरकारी कन्नड माध्यमच्या हायस्कूल मध्ये सरकारी मराठी माध्यमच्या हायस्कूलची सुरूवात करावी.त्यामुळे विद्यार्थ्याचे भले होईल तसेच बेकार पदवीधर युवकाना तरी नोकरी मिळेल.अशी आशा तालुक्याच्या जनतेतुन होत आहे.
