#तहसीलदार,चीफ आँफिसरशी चर्चा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराचा विस्तार वाढला आहे.इतर व्यवसाय वाढले आहेत.मात्र खानापूर शहरातील फिश मार्केटसाठी कायमस्वरूपी जागा नाही .त्यामुळे मासे विक्रीदाराना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
यासाठी खानापूर शहरातील मासे विक्रीदारानी फिश मार्केटसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी फिश मार्केट संघटनेचे मल्लेशी पोळ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दि.४ मार्च रोजी तहसीलदार दुंडाप्पा कोमार व चिफ आँफिसर संतोष कुरबेट याच्याशी तहसील कार्यालयात चर्चा करून शहरातील तीन जागेची पाहणी केली.
यावेळी चीफ आँफिसर संतोष कुरबेट,राजू जांबोटी यांच्यासमवेत मल्लेशी पोळ यांच्या नेतृत्वाखाली खानापूर शहरातील तीन सरकारी जागांची पाहणी केली.
यामध्ये जांबोटी खानापूर रोडवरील अँग्रीकल्चर आँफिस व सीडीपीओ आँफिस यांच्यामधील रिकाम्या जागेची पाहणी केली,तसेच बेळगाव पणजी रोडवरील हेस्काॅम कार्यालयाच्या समोरील पी डब्लू डी खात्याच्या जागेची पाहणी केली,त्याचबरोबर खानापूर पारिश्वाड रोडवरील बसस्टॅडच्या मागील बाजूस लक्ष्मीनगर क्राॅस जवळील सरकारी जागेची पाहणी करण्यात आली.
लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने कोणत्याही एका जागेवर खानापूर फिश मार्केट ची सोय करून द्यावी.अशी मागणी फिश मार्केट संघटनेच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोमार व चिफ आँफिसर संतोष कुरबेट तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे करण्यात आली.
या वेळी फिश मार्केट संघटनेचे अध्यक्ष मल्लेशी पोळ, सायमन डिसोजा,जेम्स लोबो, रोहित पोळ,हदीद हावलदार,व्हिक्टोर डिसोजा, राजू पोळ,फ्रान्सिस डिसोजा, सलुन पठाण,मालन पोळ आदी उपस्थित होते.

