#महाप्रसादाचे आयोजन !
संदेश क्रांती न्यूज :

खानापूर प्रतिनिधी
जटगे ( ता.खानापूर ) येथील ग्राम दैवत श्री हनुमान मंदिराचा चौथा वर्धापन दिन सोहळा सोमवारी दि. ९ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी सोमवारी सकाळी ९ वाजता अभिषेक, होम वहन,पुजन होऊन दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी वर्धापन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर पाटील उपस्थित राहणार आहेत.
तर दीप प्रज्वलन आमदार विठ्ठल हलगेकर व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी महाप्रसादा नंतर सायंकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यत जटगे महिला मंडळाचा हरिपाठ कार्यक्रम, रात्री ८ ते ९ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर हेब्बाळ हट्टी येथील श्रू चव्हाटा सोंगी भजनी भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.
तरी सर्वानी कार्यक्रम उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान जीर्णोद्धार कमिटी व पंचकमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.