#खानापूर तालुक्यातुन कौतुक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळांडुनी कर्नाटक राज्यस्तरीय नेटबाॅल स्पर्धेत उत्कृष्ट कामगारी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.त्यामुळे समर्थ शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
कर्नाटक राज्य मान्यप्राप्त नेटबाॅल असोशिएशन दावनगेरी यांच्यावतीने आयोजित १९ वर्षाखालील मुला मुलींच्या राजस्तरीय नेटबाॅल स्पर्धेत खानापूर समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुला मुलीच्या दोन्हीही नेटबाॅल संघ दि.७ व दि.८ फेब्रुवारी रोजी सहभागी झाले होते. या स्पर्धेत समर्थ इंग्लिश मिडीयमच्या दोन्ही संघानी खेऴाची चुणूक दाखवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या नेटबाॅल स्पर्धेत मुलांच्या संघातुन १२ पैकी ३ खेळांडुची तर मुलीच्या संघातुन १२ पैकी ३ खेळाडुची राष्ट्रीय स्थरावरील नेटबाॅल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील नेटबाॅल स्पर्धा दि.२३ मार्च रोजी बेंगळूर येथे होणार आहेत.
विजयी खेळांडुना समर्थ स्कूलचे मुख्याध्यापक बाळकृष्ण हलगेकर याचे मोलाच मार्गदर्शन मिळत आहे. तर स्कूलच्या अँडमिन सौ.दिव्या नाडगौडा यांचे सहकार्य लाभत आहे. समर्थ स्कूलचे सचिव डाँ.डी.ई.नाडगौडा याचे खेळांडुना नेहमीच प्रोत्साहन मिळत असुन विजयी खेळांडुचे अभिनंदन केले आहे.
खेळांडुच्या उकृष्ट यशाबद्दल शाळेचे संचालक मंडळ , पालक वर्ग तसेच शिक्षकवर्ग तसेच हित चिंतक रामचंद्र पाटील खेळांडुचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
