संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
"आत्मशांती मुळे कौटुंबिक समाधान आणि विश्वशांती निर्माण होते. ही आत्मशांती मिळवण्यासाठी जीवनात सद्गगुरू हे महत्त्वाचे असतात. तेच आपणास मोक्षमुक्तीचा मार्ग दाखवतात." असे मत श्री सद्
गुरु श्री भाऊ महाराज यांनी व्यक्त केले.
पारवाड(तालुका खानापूर) येथील सुवर्णधाम मठात श्री सद्गुरु पारवेश्वर महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पाच दिवस चाललेल्या या उत्सवात हजारो भाविकांची उपस्थिती होती.
सामूहिक राष्ट्रगीता नंतर श्री सद्गुरू भाऊ महाराज,श्री युवराज सोहम राजे, श्री विद्या अवधूत पीठ बेंगलोर येथील श्री श्री दत्त अवधूत स्वयंपूर्णानंद स्वामीजी, निवृत्त न्यायाधीश एम आर रंगनाथ, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात प्राध्यापक डॉ. तेजश्री कोलवलकर यांनी सांप्रदायाची शिस्त शिकवण व ध्येय धोरणे याविषयी सविस्तर माहिती दिली आणि उपस्थित यांचे स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते “ज्ञानमूर्ती” या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
निवृत्त उपप्रांतअधिकारी श्री ए जे धुमाळे, जेष्ठ पत्रकार डी के पाटील, बेंगलोर श्री विद्या अवधूत पिठाचे कार्यदर्शी प्रदीप कुमार, संचालक बी के नारायणन, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यदर्शी श्री प्रमोद कोचेरी भाजपाचे, माजी तालुकाध्यक्ष संजय कुबल, तालुका कार्यदर्शी गुंडू तोपिन कट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम कृष्णजी देसाई, राजेंद्र कुंडईकर (गोवा),. खानापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व. वकील संघटनेचे अँड ईश्वर घाडी, निवृत्त वायुदल अधिकारी प्रभाकर जगताप. कीर्ती कुमार कुलकर्णी हे व्यासपीठावर होते.
निवृत्त न्यायाधीश श्री एम आर रंगनाथ, श्री दत्ता अवधूत पूर्णानंद स्वामीजी, प्रमोद कोचेरी संजय कुबल यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. किनये येथील संगीततज्ञ शंकर पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सडेकर यांनी केले.
सायंकाळी सुवर्णधाम मठ परिसरात रथोत्सव झाला. त्यानंतर दुसरे दिवशी श्री दत्तयाग व सत्यनारायण महापूजा अधिक कार्यक्रम झाले. श्रीपाद तनयकृत श्री पारवडेश्वर महाराज ज्ञानचक्षु उपनिषद या ग्रंथाचे पारायण, पाच दिवस नित्यउपासना, नामस्मरण, भक्तांचे अनुभव कथन, भजन व प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले शेवटच्या दिवशी चिखले( तालुका खानापूर) येथे सद्गुरु पारवेश्वर संप्रदायाचा सत्संग कार्यक्रम उत्साहात झाला.

