संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील पोलिस प्रशिक्षण शाळेच्या पटांगणावर शुक्रवारी दि.६ रोजी सकाळी ८.३० वाजता चौथ्या तुकटीच्या एपीसी प्रशिक्षणार्थीचे पथ संचालन होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देव ज्योति रे.,पोलिस महा निर्देशक बेगळूर हे उपस्थित राहणार आहेत.
डॉ.चेतनसिंग राठोड पोलिस महा निर्देशक उत्तर वलय बेळगाव,बोरसे भूषण गुलाबराव पोलिस आयुक्त बेळगांव,
डी.देवराज उपपोलिस महा निर्देशक बेळगाव,के.राम राजन पोलिस अधिक्षक बेळगाव आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य एम एम यादवाड यानी केले आहे.