संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी (ता.खानापूर ) येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी हळदी कुंकू चा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीच्या उपाध्यक्षा सौ. संजना काटगाळकर ह्या होत्या. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक के एम बेलगामी यांनी प्रास्ताविक करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
आजचा हा सोहळा सौभाग्याचा मांगल्याचा आणि संस्कृतीचा अभिमान असलेला पवित्र व मांगल्याचा क्षण आहे. हळदी कुंकवाचा हा पवित्र कार्यक्रम केवळ एक परंपरा नसून सौभाग्यवतींना सन्मान देणारी एक सुंदर संस्कृतीची प्रथा आहे. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात हळदी कुंकवाला फार महत्त्व आहे. म्हणूनच हे महत्त्व आणि परंपरा आपण सर्वांनी जपली पाहिजे असे मत प्रमुख वक्त्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या व निवृत्त शिक्षिका सौ .बोर्जिस मॅडम यांनी व्यक्त केल्या. यावेळी दिपप्रज्वलन व्यासपीठावरील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व शिक्षणप्रेमी अविनाश रमेश खानापुरी , शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील लोकमान्य कॉलेजच्या प्राचार्य शरयू कदम उपाध्यक्षा सौ. संजना काटगाळकर सौ नेहा अविनाश खानापुरी माजी अध्यक्ष कृष्णा चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. परशराम खानापुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. स्त्री ही कधी माया असते कधी शक्ती कधी प्रेरणा तर कधी त्यागाची मूर्ती आपण सरोजनी एकत्र येऊन समाजात नातेबंद अधिक दृढ करायला हवेत एकमेकींना सन्मान द्यायला हवा हळदीकुंकू हा केवळ सण नाही तर संस्कृती आणि नात्यांचा उत्सव आहे असे प्रतिपादन लोकमान्य कॉलेजच्या प्राचार्य शरयू कदम यांनी मांडले. अविनाश रमेश खानापुरी यांच्याकडून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्गांना हळदी कुंकवाचा ओटीचा मानअविनाश रमेश खानापुरी यांच्याकडून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकवाचा ओटीचा मान दिला. यावेळी शाळा सुधारणा सदस्य यल्लाप्पा बाळेकुंद्री, महादेव चौगुले ,वैष्णवी पाटील,ग्रामपंचायत सदस्य रेणुका कुंभार,पीडीओ रेशमा पाणीवाले.शिवाजी वड्डर सर्व सदस्य केंद्रातील सर्व शिक्षिका व हलकर्णी गावातील सर्व महिला वर्ग उपस्थित होत्या.
या कार्यक्रमा वेळी महिलांच्या गायन स्पर्धा आणि संगीत खुर्ची या स्पर्धेत घेण्यात आल्या. आणि विजयी स्पर्धकांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक एक भेटवस्तू देऊन त्यांना गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक के एम बेलगाम यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपाली ठोंबरे यांनी केले.

