संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री वरदराज गोकाक यांनी स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयाला एकूण २ लाख ४८ हजार किंमतीचे ६ संगणक आणि प्रिंटर देणगीदाखल दिले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कम्प्युटर लॅबचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आणि सत्कारमूर्ती श्री वरदराज गोकाक आणि कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांच्या प्रयत्नातून ही बहुमोल देणगी संस्थेला मिळाली
. या वेळी सत्कार समारंभात अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री चेतन मणेरीकर यांनी डॉक्टर वरदराज गोकाक आणि गोकाक कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सत्कार समारंभातील प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पी. के. चापगांवकर यांनी केले. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर या वेळी संस्थेचे कार्यदर्शी सुहास कुलकर्णी, प्रल्हाद गोकाक, सौ. गोकाक, शाळेचे मुख्याध्यापक विनोद मराठे उपस्थित होते.

