#खानापूर समर्थ इंग्लिश मिडीय स्कूल मध्ये अन्नोत्सव फेस्टिवल साजरा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
विद्यार्थी जीवनात स्वयंपाकाचे ज्ञान नसते.त्यामुळे शिक्षणानिमित्त बाहर पडलेल्या विद्यार्थ्याना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.तेव्हा विद्यार्थी जीवनात शाळेमध्ये विद्यार्थ्याना अन्नोत्सव फेस्टिवल निमित्त स्वयंपाकाचे ज्ञान देणे ही काळाची गरज आहे. हा उद्देश ठेवून आपल्या समर्थ इंग्लिश मिडीय स्कूल मध्ये मंगळवारी दि.१३ रोजी मकर संक्रातीच्या सनाचे औचित्य साधुन अन्नोत्सव फेस्टिवलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.यामध्ये इयता ६ ते १० वी पर्यतच्या विद्यार्थ्यानी सह भाग दर्शवुन आप लिया गुणाचे दर्शन केले.याचे मला कौतुक वाटले.असे मत समर्थ इंग्लिश मिडीय स्कूलचे सचिव डॉ.डी .ई.नाडगौडा यानी कार्यक्रमाच्या उदघटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे अध्यक्ष एफ एम पाटील होते.
प्रारंभी स्कूलच्या अँँडमिन सौ.दिव्या नाडगौडा यानी प्रास्ताविक केले.तर उपस्थितांचे प्राचार्य बालकृष्ण हलगेकर यानी स्वागत केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते फित कापून अन्नोत्सव फेस्टिवलचे उदघाटन केले.
यावेळी कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन डॉ.राधाकृष्णन हेरवाडकर,संचालक डॉ.एन.एल कदम,ट्रेजरर डॉ.पी.एन पाटील ,संचालक आदेश जोरापूरे,नागराज गडदार आदी उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यानी तयार केलेल्या पदार्थाचा स्वाद उपस्थित मान्यवरानी घेतला
विद्यार्थ्यानी दिवसभर अन्नोत्सव फेस्टिवलचा आनंद लुटला.त्यामुळे विद्यार्थ्याच्या चेहर्यावर आनंद, उत्साह उसंडुन वाहत होता.
यावेळी शिक्षक सचिन व इतर शिक्षकानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.


