#जांबोटीत पत्रके वाटून जन जागृती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
१७ जानेवारी हुतात्मादिनी कडकडीत हरताळ पाळुन सकाळी ठीक ८:३० वाजता हुतात्मा स्मारक स्टेशन रोड येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जांबोटी येथील बाजारपेठेत करण्यात आले.
यावेळी माजी सभापती मारूती परमेकर,गोपाळराव देसाई अध्यक्ष खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, आबासाहेब दळवी सरचिटणीस खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, जयराम देसाई माजी जिल्हा पंचायत सदस्य, गोपाळराव पाटील मध्यवर्ती म ए समिती सदस्य, राजाराम देसाई मध्यवर्ती म ए समिती सदस्य, रविंद्र शिंदे मध्यवर्ती म ए समिती सदस्य, डी एम भोसले, म्हात्रू धबाले, अरुण देसाई, बाळासाहेब देसाई, मारुती देसाई, दत्तात्रय देसाई, शशिकांत पाटील, वसंत नावलकर, प्रभाकर बिर्जे, विठ्ठल देसाई, पांडुरंग गुरव, मधुकर राऊत, गोपाळ गावडे, वासुदेव गडकरी, शिवाजी भरणकर, राजाराम भरणकर, धोंडु गावडे, पांडुरंग गावडे, विष्णू सलाम, गोमा उशीनकर, भाऊ दळवी, मारुती गुरव, मामा कवठणकरआदी उपस्थित होते.


