भाजप नेते प्रमोद कोचेरी.
#वाढदिवसा निमित्त शुभेच्छा कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गेली ३० वर्षे खानापूर तालुका भाजप पक्षाच्या बळकटीसाठी मी सतत कार्यरत राहून खानापूर तालुक्यात भाजप पक्षाला दोन वेळा आमदार निवडुण आणण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. यापुढे ही मी खानापूर तालुका भाजप पक्षासाठी सतत कार्यरत राहुन भाजप पक्ष मोठा करीन, केवळ भाजप पक्षासाठी मी काम करत आलो आहे.
माझ्या मागे भाजप नेते , कार्यकर्ते यांचे हत्तीचे बळ आहे. म्हणून गेली ३० वर्षे कार्य केले.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त भाजप ने ते, कार्यकर्ते इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहुन जो आशिर्वाद दिला.याचा मी ऋणी आहे.असे विचार भाजप ने ते व भाजप बेळगाव जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यानी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात आयोजित वाढदिवसनिमित्त शुभेच्छा प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी सेक्रेटरी मल्लाप्पा मारीहाळ यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
या वेळी वाढदिवसानिमित्त आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपा मा जी तालुका अध्यक्ष संजय कुबल,माजी जि.प. सदस्य बाबूराव देसाई, भाजप नेत्या सौ.धनश्री सरदेसाई,भाजप ने ते सुभाष गुळशट्टी, युवा ने ते पंडित ओ गले, नंदु निट्टूरकर,लक्ष्मण झांजरे,पत्रकार विवेक गिरी,अँड.चेतन मणेरीकर ,वसंत. देसाई,भरत. गोरे आ दी नी भाजप ने ते प्रमोद को चेरी यांच्या भाजप पक्षातील कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.
त्यानंतर भाजप पक्षाच्यावतीने नेत्याच्या हस्ते शाल, पुष्पहार,पेढे भरवून प्रमोद कोचेरी याना शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर शेकडो कार्यकर्त्यानीही पुषहार ,पुष्पगुच्छ व पेढे भरून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला सॆक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप ने ते राजेद्र रायका, माजी सभापती सयाजी पाटील , मा जी ता.प. सदस्य अशोक देसाई,नगर सेवक आप्पया कोडोळी,सदानंद होसुरकर,यशवंत गावडे,सुनिल नाईक,गजानन पाटील , सुनिल मा से कर,मोहन पाटील ,बबन आल्लोळकर आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

