#गुरूवारी रात्री केले ऊसाचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात हत्तीकडुन होणारे पिकाचे नुकसान सुरूच सतत सुरूच आहे.मुघवडे ( ता.खानापूर ) गावच्या शिवा रात सर्वे नंबर १३ मधील विष्णु ओशिलकर यांच्या दीड एकर जमिनीतील ऊस व अंकुश होळणकर यांच्या शिवारातील ४ एकर जमिनितील ऊस असा एकूण पाच ते सहा एकर जमिनीतील ऊसाचा फडशा पाच हत्तीनी गुरूवारी रात्री पाडला.त्यामुळे शेतकर्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.त्याचबरोबर राम बेटगीरीकर यात्रा शिवारात हत्तीनी प्रवेश केला आहे.
याभागात गेल्या पंधरा दिवसापासुन आंबोळी , बांदेकरवाडा, कबनाळी , कांजळा त्याच बरोबर आता मुघवडे शिवारात हत्तीनी धुमाकुळ घातला.
शेतकरी हत्तीच्यापुढे हतबल झाले आहेत.परंतु वनखात्याकडुन कोणतीच मदत होत नाही. वन खाते साफ दुर्लक्ष करत आहे. अशी व्यथा या भागातील शेतकर्यानी बोलुन दाखविली.
तेव्हा वनखात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा.अन्यथा रास्ता रो को करून सरकार ला जाग आणण्याची वेळ येईल.असा ईशारा शेतकर्यानी दिला आहे.

