#शुक्रवारी रात्री केली नुकसानीची पाहणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात हत्तीकडुन होणारे पिकाचे नुकसान सतत सुरूच आहे.मुघवडे ( ता.खानापूर ) गावच्या शिवा रात सर्वे नंबर १३ मधील विष्णु ओशिलकर यांच्या दीड एकर जमिनीतील ऊस व अंकुश होळणकर यांच्या शिवारातील ४ एकर जमिनितील ऊस असा एकूण पाच ते सहा एकर जमिनीतील ऊसाचा फडशा पाच हत्तीनी पाडला.
त्यामुळे शेतकर्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.त्याचबरोबर राम बेटगीरीकर याच्या. शिवारात हत्तीनी धुमाकुळ घातला.
याघटनेची माहिती मिळताच जिल्हा वनधिकारी क्रांति व खानापूर आरएफओ श्रीकांत पाटील यानी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.
चक्क शुक्रवारी मध्य रात्री शिवारात जिल्हा वन अधिकारी क्रांति व आर एफ ओ श्रीकांत पाटील आपल्या सहकार्यासह मुघवडे शिवारात दत्त झाले.व प्रत्यक्ष हत्तीपासुन काही अतंरावरून पाहणी केली.यावेळी दोन दिवसाचे हत्तीचे पिल्लू व पाच हत्तीचा कळप असल्याचे दृष्य वन अधिकार्याना दिसले.
लागलीच शेतकर्याना हत्तीपासुन सर्वानी सावध राहण्याचा ईशारा जिल्हा वनअधिकार्यानी दिला.कारण दोन दिवसाचे हत्तीचे पिल्लू असल्याने हा हत्तीचा कळप केव्हा ही माणसावर हल्ला करू शकतो.कोणी त्या भागात फिरू नये.तुमच्या झालेल्या ऊस पिकाची नुकसान भरपाई वन खाते देणार आहे. तुम्ही तुमचा जीव सांभाळा .असे सांगुन आम्ही शेतकर्याच्या कायम पाठीश राहणार असल्याचे सांगीतले.
याभागात गेल्या पंधरा दिवसापासुन आंबोळी , बांदेकरवाडा, कबनाळी , कांजळा त्याच बरोबर आता मुघवडे शिवारात हत्तीचे वास्तव्य आहे.तेव्हा सर्वानी स्वताला साभाळुन राहावे.असे आवाहन केले.

