संस्थापक विलास बेळगावकर
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी सारख्या दुर्गम परिसरात सन १९९३ साली सहकार क्षेत्राची सुरूवात केली .आज गेल्या ३३ वर्षापासुन जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने प्रगतीची घोडदौड करत आहे.हे केवळ सोसायटीच्या
सभासदानी ठेवलेल्या विश्वासामुळे सत्यात उतरले.त्यामुळे तालुक्यातील पहिली मल्टीपर्पज सोसायटी म्हणून जांबोटी सोसायटीची ओळख आहे.
जांबोटी भागातील दीनदुबळ्याना, मदत करणे, गरजू व्यवसायकाना आडचणीच्यावेळी आर्थिक सहाय्य करणे,गरीब विद्यार्थ्याना मदत करने, शैक्षणिक , सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सोसायटीची नेहमी सहकार्याची भुमीका असते.
या सोसायटीचा व्यवहार पारदर्शक असल्याने सोसायटी ची भरभराट झाली .
इतकेच नव्हे तर सभासदाचा विश्वास , कर्मचार्याचा प्रामाणिकपणा त्यामुळे सोसयटीची प्रगती झाली.असे विचार जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर यानी सोसाटीच्या ३३ व्या वर्धापन दिन व सोसायटी च्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यघपदावरून बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी संचालक शंकर कुडतुरकर यानी प्रास्ताविक केले.तर जनरल मॅनेजर दिलीप हन्नूरकर यानी उपस्थितांचे स्वागत केले.
या वेळी व्यासपिठावर उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी,संचालक भैरू वाघू पाटील, पांडुरंग नाईक,यशवंत पाटील,खाचापा काजुनेकर, तसेच. प्रमुख वक्ते म्हणून मुख्याध्यापक महेश सडेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्य वर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
या वेळी उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी,संचालक भैरू पाटील, मुहम्मदअल्ली डंबलकर,पी.एल.पाटील, पत्रकार विलास कवठणकर, हणमंत जगताप, तसेच संतोष गुरव,आ दी ची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन प्रेरणा राजाराम कुडतुरकर हिने सी.ए.पदवी घेतल्या निमित्त व मोरब गावच्या सुपूत्र विनायक सदावर ही आर्मी भरती झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अनंत सावंत ,शिवाजी हणबर,यांच्यासह संचालक, सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनरल मॅनेजर दिलीप हन्नुरकर यानी केले.तर आभार संचालक यशवंत पाटील यानी मानले.

