संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हब्बनहट्टी ( ता. खानापूर ) येथील स्वयंभू मारूती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थान हे
खानापूर तालुक्यांसह बेळगाव व चंदगड तालुक्यातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थान वरील मलप्रभा नदीच्या नदीपात्रातील श्री स्वयंभू मारुती मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील श्री मंडपात फरशी बसवण्याचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थित नुकताच संपन्न झाला.
यावेळी खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील, कर्नाटक सरकार भाजपाचे माजी विशेष प्रतिनिधी शंकर गौडा पाटील यांचे चिरंजीव अक्षय पाटील,खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी, बेळगावचे नगरसेवक बसवराज मोदगेकर, समाजसेवक सुधीर नेसरीकर, बिल्डर्स राजू हम्मण्णावर, सामाजिक कार्यकर्ते राजू चिगरे, पांडुरंग ट्रान्सपोर्टचे ज्ञानेश्वर कसार्लेकर आदी मान्यवरांच्या हस्ते फरशी बसवण्याचा शुभारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसार्लेकर होते. खानापूर तालुक्यातील तसेच बेळगाव, चंदगड, गोवा व कर्नाटकातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वयंभू मारुती देवस्थानच्या विकासासाठी उपस्थित मान्यवरांनी भरघोस आर्थिक मदत केली आहे.यावेळी मान्यवरांनी देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी श्री समोरील मंडपात भाविक भक्तांना दर्शनाच्या वेळी रांगेने सुव्यवस्थित दर्शन होण्यासाठी स्टील ग्रील देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच भाजपाचे नेते शंकरगौडा पाटील यांचे चिरंजीव अक्षय पाटील यांनी पन्नास हजार रुपये, पुणे येथील शुगर फॅक्टरचे एम.डी रमाकांत नाईक यांनी एक्कावन हजार रुपये तसेच कॉम्प्युटर इंजिनिअर गणेश मोदगेकर (बेळगाव), समाजसेवक सुधीर नेसरीकर (बेळगाव),बिल्डर्स राजू हम्मण्णावर (बेळगाव), समाजसेवक राजु चिगरे, पांडुरंग ट्रान्सपोर्टचे मालक ज्ञानेश्वर कसार्लेकर, इंजिनिअर नारायण पाटील व प्रसन्ना बिर्जे, ॲड ईश्वर घाडी, विष्णू सांबरेकर,निवृत्त तहसीलदार एन.एन.पाटील आदी मान्यवरांनी भरघोस देणग्या दिल्या आहेत.
याप्रसंगी देवस्थान कमिटीचे कार्याध्यक्ष नेताजी घाडी, उपाध्यक्ष नानु गावडे,सदस्य चिदंबर गावकर पुंडलिक पाटील, गंगाराम गावडे,नामदेव गुरव आदी कमिटी सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थान कमिटी सेक्रेटरी संतोष कदम यांनी केले तर माजी अध्यक्ष सखाराम धुरी यांनी आभार मानले.
