#खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी के एस आर टी सी धारवाड डिव्हिजन आयुक्त शशिधर यांची घेतली भेट! केली सूचना!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील शिंदोळी ग्रामपंचायत हद्दीतील शिंदोळी, होनकल, गंगवाळी, सावरगाळी माणिकवाडी नायकोल येथील विद्यार्थ्यांना खानापूर, बेळगाव येथे शिक्षणासाठी जाण्यास बसची समस्या भेडसावत आहे. या भागातील जवळपास 130 ते 150 विद्यार्थी शाळा कॉलेज महाविद्यालयासाठी येजा करतात.
मात्र रामनगर , लोंढा येथून येणाऱ्या बसेस सकाळच्या वेळी प्रवाशांनी भरून येत असतात. त्यामुळे बस थांबत नाही. सकाळच्या वेळी कॉलेज, शाळा व महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. तसेच करंजाळ ,किरावळे तिनेईघाट, झटगे या बसेस गर्दीमुळे थांबत नाहीत. यासाठी या शटल बसेस होनकल, गंगवाळी, सावरगाळी, माणिकवाडी, नायकोल, येथे थांबून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था करावी.
अशा प्रकारची सूचना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांनी खानापूर भेटीला आलेले के एस आर टी सी धारवाड डिव्हिजनचे आयुक्त श्री शशीधर यांना केली. त्यावेळी के एस आर टी सी धारवाड डिव्हिजनचे आयुक्त श्री शशिधर यांनी सूचना ऐकून घेऊन निवेदनाचा स्वीकार केला.
यावेळी खानापूर डेपो मॅनेजर संतोष तसेच खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, खानापूर तालुका ग्रामपंचायत युनियन संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर,
ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील. शिंदोळी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ.प्रतीक्षा पुंडलिक कर्लेकर, सदस्य गौरी बसप्पा मादर ,शोभा नागेश मादर, साक्षी आनंत जुंजवाडकर , सोनाली संभाजी पाटील ,गंगू अप्पाजी पाटील, मिलन महादेव पाटील, वर्षा बाळकृष्ण पाटील, नीता नितीन पाटील आदी उपस्थित होत्या.
#खानापूर मूघवडे बस समस्या!

यावेळी नलावडे ग्रामपंचायत सदस्य विनायक मुतगेकर यांनी ही खानापूर ते मुघवडे बस गेल्या दोन वर्षपासुन आंबोळी गावामध्ये जात होती .परंतु आत्ता अचानक दोन दिवस झाली.आंबोळी गावात जायची बस बंद केल्यामुळे तेथील विद्यार्थी, नागरिकांना, महिलांना, वृद्धांना खानापूरला येणास त्रास होत आहेत. तेव्हा ती बस पुन्हा चालू ठेवावी अशी सुचना विनायक मुतगेकर , ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी के एस आर टी सी चे धारवाड आयुक्त श्री शशिधर यांच्याकडे केली. यावेळी खानापूर डेपो मॅनेजर संतोष हजर होते.


