#पंतप्रधान मोदीनी, गृहमंत्री शहा यानी यावर त्वरित कठोर निर्णय घ्यावेत.!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
आपल्या हिंदूच्यावर बांगलादेशात सातत्याने अत्याचार होत असुन वेग वेगळ्या घटना घडत आहेत.एवढेच नव्हे तर नुकताच टीपू दास या हिंदू युवकाची निघृण हत्या करून त्याचा मृत्यदेह झाडाला टांगुन जाळण्यात आला.अशा निंद प्रकाराने भारत भर संतापाची लाट पसरली आहे. तेव्हा हिंदूच्या रक्षणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यानी यावर कठोर निर्णय घ्यावेत.अशी मागणी अँड. चेतन मणेरीकर यानी शुक्रवारी हिंदू रक्षा मोर्चाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चाच्यावेळी तहसीलदाराना निवेदन देताना केली.
या वेळी भाजप नेता पंडित ओगले, भाजप माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, बजरंदल हिदुत्ववादी नेते नंदकुमार निट्टूरकर,बाळू सावंत, आ दी नी निषेध व्यक्त केला.
प्रारंभी रॅली काढुन शिवस्मारक पासुन तहसील कार्यालया पर्यत मोर्चा काढण्यात आला.
या वेळी घोषणाबाजी करून तहसील कार्यालय हदरून सोडले.
यावेळी प्रभारी ग्रेड टू तहसीलदार एस. के. तंगोळी यानी निवेदनाचा स्वीकार करून सरकारकडे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना माजी सभापती सयाजी पाटील, भाजपा ने ते बाबासाहेब देसाई, राजेंद्र रायका, रवी काडगी,रवी पाटील, पंकज कुट्रे, सुभाष देशपांडे, रवी बडगेर, शिवा मयेकर, प्रशांत लक्केबैलकर,संदिप शमले,अनंत सावंत आदी हिंदु कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
