ऊस ,केळी,चिकू झांडाचे प्रचंड नुकसान”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगल परिसरातील आंबोळी, बांदेकरवाडा,कबनाळी, मुघवडे, कांजळा आदी भागात गेल्या अनेक दिवसापासुन हत्तीकडुन पिकांचे प्रचंड नुकसान केले जात आहे.
आंबोळी गावच्या सर्वे नंबर ५८ मधील शेतातील रामू चोर्लकर, लक्ष्मण चोर्लेकर,बाळू चोर्लेकर, कै. मारूती चोर्लेकर यांच्या मालकीचा २५ टन ऊस ,केळीची झाडे, चिकूची झाडे,आंब्याची झाडे आदीचे प्रचंड नुकसान केले आहे.
तसेच बांदेकरवाडा येथील शेतकरी दळवी यांच्या मालकीच्या शेतातील ५०० केळीची झाडे,यांचे ही प्रचंड नुकसान केले आहे.तसेच शेतकर्याच्या १५ पोत्याच्या भाताच्या मळणीतील भात फस्त केले.त्यामुळे शेतकर्यावर उपासमारीची वेळ आली आहे.याघटनेची माहिती खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर याना देण्यात आली. लागलीच विनायक मुतगेकर यानी आर एफ ओ श्रीकांत पाटील याना संपर्क साधुन घटनेची माहिती दिली.
नुकताच जिल्हा वन अधिकारी क्रांती आर एफ ओ श्रीकांत पाटील यांच्या कर्मचार्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व घटनेचा पंचनामा केला.
नुकसान ग्रस्थ शेतकर्याना नुकसान भरपाई मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर,
खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्षव खानापूर ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी व याभागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जंगलभागातील शेतकर्याच्या सततच्या नुकसानीला कोण जबाबदार!
खानापूर तालुका हा जंगलाने व्यापलेला तालुका आहे.या तालुक्यात प्रत्येक वर्षी ल्पिकांचे जंगली प्राण्याकडुन प्रंचड नुकसान होते.
आजपर्यत शेतकर्याच्या नुकसानीला ना वन खाते जबाबदार ,ना सरकार अशाने शेतकरी वैतागले आहेत. त्यातच तटपुंजी नुकसाण मिळाल्याने शेतकर्याना जगणे मुश्किल आहे.
