खानापूर प्रतिनिधी
मूळचे किरहलशी (ता.खानापूर ) येथील रहिवाशी सध्या राहणार रूमेवाडी क्राॅस खानापूर येथील राजाराम कृष्णाजी पाटील (वय 57 ) यांचे आज रविवार दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा मुलगी जावई आई-वडील तीन भाऊ बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी आठ वाजता किरहलशी येथे होणार आहे. ते करंबळ येथील पाटील गार्डनचे मॅनेजर म्हणून काम पाहत होते.
रूमेवाडी (ता. खानापूर ) येथील मराठी शाळेच्या शिक्षिका सौ .प्रतिभा गुरव यांचे ते पती होत.