संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पारिश्वाड ( ता. खानापूर) गावचे सुपूत्र व राज्य सहकार रत्न पुरस्कार प्राप्त सुभाष गुळशेट्टी यांचा सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगीरीबद्दल सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल रविवारी दि.१४ रोजी पारिश्वाड येथील दानम्ना देवी मंगल कार्यकार्यालयात सत्कार सोहळा पार पडला.
कारंजी मठाचे गुरूसिध्द महास्वामीॆ,सिध्दशांडिलेश्वर मचाये शुभ लिंग शिवाचार्य तसेच बेळकी रूद्र स्वामी मठाचे चन्नबसव देवरू बस मठाचे प्रशांतदेवरू यांच्या सन्निध्यात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवानंद पाटील होते.
कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेक, डी सी सी बॅक संचालक ,माजी आमदार अरविंद पाटील ,भाजपा जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी , सरचिटणीस मल्लिकार्जुन मदण्णावर, टीएरीएमसी शंकर गौड़ पाटील ,संचालक महांतेश अलबादी ,माजी ब्लाॅक क्राॅग्रेस अध्यक्ष अशोक अंगडी, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने व फोटो पुजनाने झाली.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सहकार रत्न पुरस्कार प्राप्त सुभाष गुळशेट्टी यांचा शाल , पुष्पहार व मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्य क्र माला बेळगाव जिल्हा संघटक संचालक अनंत पाटील, सुरेश हुल्लीकट्टी, भाजप जिल्हा सचिव सुनील मड्डीमनी , वीरपुत्र पुजार, इटगी ग्राम पंचायत अध्यक्ष रूद्राप्पा तिरमुरी ,धर्मस्थळ ग्राम विकास नियोजन अधिकारी गणपती नायक व विविध संघ संस्थाचे पदाधिकारी, संचालक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्य क्र माचे स्वागत रेणुका पाटील यानी केले.तर आभार वीरेश देवरमणी यानी मानले.
