#विद्यानगरात रस्त्यासाठी प्रयत्न करणारे पहिले आमदार विठ्ठलराव हलगेकर,!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्या नगरात गेल्या २५ वर्षापासुन कोणत्याच आमदारानी रस्ता, गटारीची समस्याकडे लक्ष दिले नाही.
मात्र भाजपचे विद्यामान आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी खानापूर शहरापासुन हकेच्या अंतरावर असलेल्या विद्यानगरातील रस्त्याची व गटारीची समस्या जाणुन घेतली. व विद्यानगरातील रस्त्याच्या कामासाठी आमदार फंडातुन सी सी रोड मंजुर करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला.
त्यामुळे विद्यानगरातील रहिवाश्यानी नुकताच आमदार विठ्ठलराव हलगेकर याची भेट घेऊन २५ वर्षाच्या काळानंतर विद्यानगरातील रस्त्याची समस्या सोडविणार व प्रत्यक्ष विद्यानगरात भेट देऊन आपुलकीने समस्या सोडविणारे पहिले आमदार म्हणजे विठ्ठलराव हलगेकर होय.म्हणुन विद्यानगरातील रहिवाश्यानी भेट घेऊन समाधान व्यक्त केले.
या वेळी भाजप युवा नेते रवी बडगेर, खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, शिक्षक के.एच.कौंदलकर, पांडुरंग देसाई, निवृत्त सुभेदार अरूण गावडे, मारुती घाडी, प्रल्हाद दौपदकर,रामचंद्र राठोडकर,बळीराम पाटील,नारायण पाटील,वृशांत पुजारी, रोहण देसाई, आनंद नाईक,काजपेल मस्करेन आदी नागरिक उपस्थित होते.

