#अज्ञात व्यक्तीकडुन वाईट कृत्य!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात सगळीकडे सुगीच्या हंगामाला जोर आला आहे., भात मळण्यासाठी शेतकर्याचा धावपळ सुरू असतानाच गर्बेनहट्टी ( ता.खानापूर ) येथील शिवा रात शेतकरी निवृत्ती नामदेव पाटील यांच्या मालकीच्या सहा भाताच्या गंज्या तसेच चार टँक्टर गवत जळुन खाक झाले. असुन अंदाजे दोन लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येेत आहे.
गर्बेनहट्टीचे शेतकरी निवृत्ती पाटील यानी सुगीत भात कापून सहा भाताच्या गंज्या उभ्या केल्या होत्या. तर त्याला लागुनच शेतकरी कुमार परशराम पाटील यांच्या मालकीचे चार टँक्टर गवत जळुन खाक झाले आहे. त्याचे ही नुकसान झाले आहे.
“आग कशाने लागली संशय”
या शिवारातुन कोणत्याच प्रकारच्या विधुत तारा गेल्या नाहीत.की वीजवाहिण्या गेल्या नाहीत, त्यामुळे शाॅर्टसर्किटचा प्रश्न येत नाही.
त्यामुळे ही आग कोणी अज्ञात व्यक्ती कडुन वाईट बुध्दीने लावण्यात आली असल्याचा तर्क शेतकरी वर्गातुन चर्चीला जात आहे.
रविवारी रात्री आग लागल्याचा अंदाज!
तसेच काल रविवारी दि.१४ डिसेंबर रोजी रात्री कोणी अज्ञात व्यक्तीने वाईट कृत्य केले असल्याचे सोमवारी शेतकरी शेतात गेल्यानंतर दिसुन आले.तोपर्यत आगीने सर्व बाजुनी पेट घेऊन भात गंज्या, गवत जळुन खाक केले होते.
तेव्हा कृषी खात्याच्या अधिकार्यानी लागलीच पंचनामा करून शेतकर्याला आर्थिक मदत मिळवुन द्यावी. तसेच पोलिसानी या घटनेची सखोल चौकशी करून अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी.अशी मागणी गर्बेनहट्टी परिसरातील शेतकर्यातुन होत आहे.

