#१४ व १७ वर्षाखालील दोन संघाची निवड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचा १४ व १७ वयोगटातील नेटबाॅल संघ चामराजनगर येथील डाॅ.बी.आर.
आंबेडकर स्टेडीयम येथे दि.१२ ते १४ डिसेंबरला होणार्या नेटबाॅल राज्यस्तरी स्पर्धेसाठी गुरूवारी दि.११ रोजी सायंकाळी खानापूर रेल्वेस्थानकावरून बेळगाव म्हैसुर एक्सप्रेस रेल्वेने रवाना झाले.
यावेळी नेटबाॅल संघाना शुभेच्छा देण्यासाठी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे सचिव व खानापूर डॉक्टर असोसिशन चेअरमन डाँ. डी.ई.नाडगौडा, नेटबाॅल कोच व क्रिडाशिक्षक बाळकृष्ण हलगेकर ,स्कूलच्या अँडमिन सौ.दिव्या नाडगौडा अश्विनी गुरव व सचिन गुरव,श्री.नरोना इतर शिक्षक व पालकवर्ग शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यास्पर्धेसाठी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल च्या नेटबाॅल संघातील २२ खेळाडूची निवड राज्यस्पर्धेसाठी निवड झाली. खानापूर तालुक्यातुन नेटबाॅल खेळासाठी राज्यस्पर्धेसाठी निवड झालेले हे पहिले स्कूल आहे.
त्यामुळे समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल च्या नेटबाॅल संघाचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
