#बैलगाडीतुन पडल्याने अंगावरून चाके गेली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सध्या तालुक्यात भात सुगीची धांदल सुरू आहे.सागरे (ता. खानापूर) येथील शेतकरी विष्णु हणमंत पाटील ( वय ७० ) हे आपल्या शेतातल भात मळणी करून सायंकाळी बैलगाडीतुन भात घेऊन ये ता ना ,अचानक बैल उधळल्याने शेतकरी बैलगाडीतुन पडुन त्याचवेळी बैलगाडीची चाके अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या पत्नी समोरच ही घटना घडली.
लागलीच नंदगड पोलिस स्थानकात घट ने ची माहिती दिली. पो लि सा नी घटना स्थळी धाव घेऊन पंच ना मा केला. व उत्तरीय तपासणीसाठी मृत देह खानापूर सरकारी दवाखान्या हालविण्यात आला.
घट ने ची माहिती सागरे गावात सजताच गा वा वर शोककळा पसरली.
गुरूवारी उत्तरीय तपासणी नंतर सागरे गावात अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्याच्या पश्चात पत्नी ,दोन विवाहित मुली, नांतवंडे असा परिवार आहे.