#सर्वानी सावध राहण्याचे आवाहन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) गावच्या उत्तरेस असलेल्या कणवीच्या जंगलात बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा पसरली आहे.
बेळगावहुन राजहंसगड मार्गे गर्लगुंजीला येताना कणविच्या जंगलाला लागुन असलेल्या रस्त्यावरून अनेकजनाना बिबट्याचे दर्शन झाले.
त्यामुळे गर्लगुंजी परिसरात भितीचे वितरण पसरले आहे.
सध्या गर्लगुंजी परीसरात वाट व्यवसायाला प्रारंभ होत आहे. शिवारात वीट कामकार आपल्या कुंटूबासह वास्तव्यास आले आहेत.
त्यामुळे वीटकामगारातुन भितीचे सावट पसरले आहे.
तेव्हा गर्लगुंजी ग्राम पंचायत तसेच वन खात्याकडुन वीटकामगाराना बिबट्यापासुन सेवक राहण्यासाठी झोपडीच्या आजुबाजुला शेकोटी पेठवुन ठेवा. तसेच आपली कुत्री, बकरी, लहान रेडके सुरक्षितसाठी झोपडीत अथवा घरात बांधा. लहान मुलाना बाहेर सोडू नका. एकट्याने निर्जन स्थळी अथवा झाडाजुडूपात जाऊ नयेे.गर्लगुंजी परिसरातील पोल्ट्री मालकानी वेस्ट माल दुर टाकावा.जेणे करून कुत्री त्यावर अवलंबुन राहणार नाहीत.
दुचाकीवरून प्रवास करणार्या वाहन धारकाना रात्रीच्यावेळी सावध राहावे.बिबट्या नजरेस पडल्यास गर्लगुंजी ग्राम पंचायत तसेच वनखात्याशी संपर्क साधवा. असे आवाहन करण्यात आलेआहे.
