संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
मुळचे तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) गावचे सुपूत्र सध्या मयेकर नगरातील रहीवासी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना खानापूर तालुका माजी अध्यक्ष व. निवृत्त मुख्याध्यापक ए.बी.मुरगोड यांचा शुक्रवारी दि.१२ डिसेंबर रोजी ६७ वा वाढदिवस साजरा होत आहे.
निवृत्त मुख्याध्यापक ए . बी. मुरगोड याची साधी राहणी व प्रत्येकाला सहकार्य करण्याची मनोवृती त्यामुळे ते सर्वाना प्रिय असणारे व्यक्तीमत्व आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रत्येक कार्यात ते पुढाकार घेत असत.त्यामुळे खानापूर शतालुक्यासह बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकाचा गोतावळा मोठा आहे.
निवृत्ति नंतर ही शिक्षकाच्या आडचणी तसेच कार्यालीयन कामकाज आज सुद्दा ते रात्रनदिवस करतात. त्यामुळे आज ही ते शिक्षकांच्या कामात २४ तास व्यस्त असतात.
त्याच बरोबर समाज कार्यात ही नेहमी अग्रेसर असतात. विविध संघ संस्थाशी त्याचा घनिष्ठ संबध आहे.राजकीय नेत्याशी त्यांचे आगदी जवळचे सबंध आहेेत.
अशा सर्व संपन्न गुणी निवृत्त मुख्याध्यापक ए बी मरगोड यांचा शुक्रवारी दि १२ डिसेंबर रोजी ६७ वा वाढदिवस साजरा होत आहे.
या वाढदिवसा निमित्त त्याना लाख लाख शुभेच्छा व त्याना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!