#वस्त्रोधोग मंत्रालय भारत सरकारच्यावतीने पुरस्कार सोहळा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी ( फुलेवाडी) गावचे सुपूत्र व कुंभार कलाकार पुंडलिक कुंभार याना नवीदिल्ली येथे विज्ञान भवनाच्या प्लेनरी हाॅलमध्ये वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकारातर्फे हस्तकला पुरस्कार सोहळा मंगळवारी दि. ९ रोजी पार पडला.
या पुरस्कार सोहळ्याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रमुख म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह उपस्थित होते.
यावेळ खानापूर तालुक्यातील कुंभार कलाकार पुंडलिक कुंभार याना टेराकोटा व माती काम मधील कारागिर आणि विकासातील योगदानाबद्ल हा पुरस्कार सह प्रमाणपत्र दे ऊन सन्मानासह गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला परराष्ट्र व वस्त्रोधोग राज्यमंत्री प वित्रा माॆर्गारिटा यांची विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते.
भारतातील उत्कृष्ट हस्तकला क्षेत्रातील कारागीराना या कार्यक्रमात सम्मानित करण्यात आले . या पुरस्कार सोहळ्याला हस्त कला क्षेत्रातील दिग्गज कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच अनेक मान्य वर व अधिकार उपस्थित होते.

