#आधीच रस्त्याच्या कामामुळे व्यापारी वर्गात रोष व नाराजी त्यातच येणार्या ग्राहकावर कारवाई!
खानापूरात चाललय काय?
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सोमवार दि. ८ पासुन बेळगाव येथे अधिवेशन चालु आहे. अधिवेशन काऴात पोलिसानी कायदा सुव्यवस्था ठेवन्याची काळजी बेळगावात असणे गरज असताना बुधवारी दि.१० रोजी खानापूर शिव स्मारक चौकात पोलिसानी दुचाकी स्वाराना अडवुन धरपकड सुरू केली व दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केला.
खानापूरात हायवे रस्ताच्या कामाने आधीच व्यापारी वर्गावर संक्रात!
खानापूर शहर अंतर्गत राजा टाईल्स ते करंबळ फाटा पर्यंत रस्त्याच्या कामाला गेल्या तीन महिण्यापासुन कामा निमित्त रस्ता वाहतुकीला बंद ठेवण्यात आला आहे.
याभागात तहसील कार्यालय, हॉस्पिटल, बैंका,शाळा, रेल्वे स्थानक,आदी मुख्य ठिकाणीे असल्याने जनतेला दररोज महत्वपूर्ण असलेला रस्त्यावरून येजा करावी लागते.
शिवाय इतके दिवस मच्छी मार्केट पासून दुचाकी मार्ग चालू होता.तेहि मार्ग बंद केला त्यामुळे खानापूर शहरात नागरीक व व्यापारी वर्गावर संक्रांत आली आहे.
अशा वेळी ग्राहक नाहीत आणि चुकुन येणार्या जनतेच्या दुचाकी आडवुन शिवस्मारक चौकात दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे बुधवारी दिसुन आले.
तेव्हा खानापूरात काय चाललेय असा सवाल खानापूर शहरवासीयातुन चर्चिला जात आहे.
